गुजरातमध्ये गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध रहित !

श्री. भूपेंद्र पटेल, मुख्यमंत्री गुजरात

कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारने गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींच्या उंचीवरील निर्बंध मागे घेतले आहेत. वर्ष २०२१ मधील कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक गणेशोत्स्व मंडळांच्या गणेशमूर्तींची उंची ४ फूट आणि घरगुती गणेशमूर्ती २ फूटांहून अधिक असू नये, असे निर्बंध घालण्यात आले होते.

३१ मार्च २०२२ नंतर कोरोनाचे कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवासाठी मूर्तींच्या उंचीवरील निर्बंध मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घेतला आहे, असे सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.