कोल्हापूर, १९ जुलै (वार्ता.) – गेल्या आठवड्यात सततच्या संततधार पावसाने अगदी धोक्याच्या पातळीजवळ पोचलेल्या पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.