काबुल – उत्तरी अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० पेक्षा अधिक लोक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अफगाणिस्तानच्या ‘बख्तर’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिली. परवान प्रांतातील ३ पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पुरामुळे अनेक घरे वाहून गेली आहेत. पूरग्रस्त भागांत बेपत्ता लोकांचा शोध आणि बचावकार्य चालू आहे, असे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देशभरात अतिवृष्टी आणि पूर यांमुळे जून आणि जुलै मासांमध्ये अनुक्रमे १९ आणि ४० लोकांचा मृत्यू झाला होता.
Heavy rains set off flash #floods that killed at least 31 people and left dozens missing in northern #Afghanistan https://t.co/NgGS0QjUBz
— Gulf News (@gulf_news) August 15, 2022