भारताशी पुन्हा व्यापार करण्याची पाकची घोषणा !

पूर आणि महागाई यांचा परिणाम !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये आलेल्या पुरामुळे पिकांची मोठी हानी झाली आहे. तसेच महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भाव गगनाला भीडले आहेत. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पाकिस्तानचे अर्थमंत्री यांनी दिली आहे. तसेच ‘भारतासमवेत व्यवसाय चालू करण्याचे अनेक दिवसांपासून प्रयत्न चालू आहेत’, असेही ते म्हणाले. यापूर्वी लाहोर बाजार समितीचे सचिव शहजाद चीमा यांनीही सरकार भारतातून कांदा आणि टोमॅटो आयात करू शकतो, असे म्हटले होते. मार्च २०२१ मध्ये, पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीने अटारी सीमेवरून भारतातून साखर आणि कापूस आयात करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र काही दिवसांतच तेथील राजकीय पक्षांनी विरोध केल्याने हा निर्णय रहित करण्यात आला.

संपादकीय भूमिका

  • संकट आल्यावर पाकला भारताची आठवण येते; मात्र जिहादी आतंकवाद थांबवण्याचा विचार पाकला का येत नाही ? आतंकवाद थांबल्याविना भारताने पाकला कोणतेही साहाय्य करण्याची गांधीगिरी करू नये !
  • सापाला कितीही दूध पाजले, तरी तो गरळच ओकणार हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे !