अमरावती येथे पुराच्या पाण्यात ट्रॅक्टरसह ५ जण वाहून गेले !

अमरावती – जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील बेंबळा नदीवरील पूल ओलांडताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पुलाला कठडे नसल्याने ५ जणांसह ट्रॅक्टर वाहून गेला. ही घटना ८ ऑगस्टच्या सायंकाळी ७ वाजता घडली. यातील २ जण पाण्यातून बाहेर आले असून ३ जण अद्याप सापडलेले नाहीत.