बसवाहकाने एक रुपया परत दिला नाही; म्हणून प्रवाशाला ३ सहस्र रुपये हानीभरपाई !

बेंगळुरू येथे बसवाहकाने प्रवाशाला तिकिटाचा एक रुपया परत न दिल्याने प्रवाशाने ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली. याच्या परिणामस्वरूप न्यायालयाने ग्राहकाला ३ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणी पशूहत्या होऊ नये, याकरता ठळक सूचना फलक लावा ! – पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालये संचालनालय यांचे पत्र

विशाळगडावर सर्रास पशूहत्या केली जाते आणि हे गेली अनेक वर्षे गडप्रेमी शासनास निवेदन, आंदोलन यांद्वारे सांगत आहेत. त्या संदर्भात कारवाईचे अधिकार असतांनाही आजपर्यंत विशाळगडावर चालू असलेल्या पशूहत्येच्या संदर्भात कारवाई का करण्यात आली नाही ?

नागपूर शहरात अस्‍वच्‍छता पसरवणार्‍यांकडून ४ मासांत १२ लाखांचा दंड वसूल !

स्‍वातंत्र्याच्‍या ७५ वर्षांनंतरही उपराजधानीसारखी शहरे अस्‍वच्‍छ असणे हा जनतेला प्रशासनाने शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

तुर्भे येथे बंदी असलेल्या थर्मोकोलची साठवणूक करणार्‍यावर कारवाई, ५ टेम्पो थर्मोकोल जप्त

या कारवाईत संबंधित दुकानदाराला १० सहस्र रुपये दंड आकारण्यात आला. नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना तुर्भे येथे लक्ष्मी इंटरप्राईजेस या दुकानात मोठ्या प्रमाणात थर्माकोलचा साठा असल्याची माहिती मिळाली होती.

पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे वर्ष २००९ मध्ये धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे प्रकरण

उरलेल्या ७ आरोपींनाही शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित !

नागपूर येथील मोकळ्या जागेवरील कचरा उचलण्याचा व्यय मालकांकडून वसूल करणार

भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्‍यांना, तसेच घाण करणार्‍या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे. 

ऑक्टोबर मासात खासगी बसगाड्यांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ लाख ८६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला !

दीपावलीच्या कालावधीत खासगी बसगाड्यांकडून भाडेवाढीच्या निमित्ताने जी लूट होते, त्याची तक्रार नोंदवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. या क्रमांकावर ‘शून्य’ तक्रारी नोंद झाल्या, असे कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

ग्राहकांना १० लाख रुपये हानीभरपाई देण्याची दोघा दुकान मालकांना शिक्षा

न्यायालयाने हरिद्वारमधील मद्यविक्री करणार्‍या २ दुकानांना मद्यविक्री करतांना अधिक शुल्क आकारल्याच्या प्रकरणी १० लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. यासह खटल्याच्या व्ययासाठी (खर्चासाठी) १० सहस्र रुपयांचा दंडदेखील केला.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात कचरा टाकणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीवर आली क्षमा मागण्याची वेळ !

ज्याला ‘कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये’ हे समजत नाही, तो महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी होण्यास पात्र आहे का ?