दळणवळण बंदीतील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे येथे हॉटेल चालकाला दंड

‘हॉटेल मिलन’च्या मालकाने हॉटेलमध्येच ४० ते ५० नागरिकांना प्रवेश देऊन त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ही माहिती मिळाल्यावर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांनी ही कारवाई केली.

पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील ‘मॉर्निंग वॉक’ करणारे ३७ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

२२ मे या दिवशी ‘मॉर्निंग वॉक’साठी रस्त्यांवर फिरणार्‍या ७० नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या वेळी ७० पैकी ३७ नागरिक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

संभाजीनगर येथे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाकडून २६ दुकाने आणि आस्थापन यांच्यावर कारवाई !

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कामगार उपायुक्त, महानगरपालिका आणि महसूल अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत ‘विशेष भरारी पथके’ सिद्ध करुन कार्यवाही करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.

ब्राझिलच्या राष्ट्रपतीकडून कोरोना नियमावलीचा भंग केल्याने त्यांना दंड

ब्राझिलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना कोरोना नियमावलीचा भंग केल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने नगर येथील १९ सहस्र नागरिकांवर कारवाई !

कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून लागू केलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांचे ५ खासगी कोविड रुग्णालयांना पैसे परत करण्याचे आदेश !

तसेच रक्कम परत न केल्यास प्रतिदिन १ सहस्र रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल’, असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

नगर येथे विवाह सोहळ्यावर कारवाई करत वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

२ मे या दिवशी सकाळी साडेदहा वाजता लोकांची गर्दी जमवून विवाह समारंभ होत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलिसांनी पथकासह पाहणी करत मुलीच्या घरी विवाह आयोजित केल्याने वधूपित्याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला.

बैठकीत विनामास्क सहभागी झालेल्या थायलंडच्या पंतप्रधानांकडून दंड वसूल !

बँकॉकमध्ये मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. बँकॉकचे राज्यपाल असविन क्वानमुआंग यांनी पंतप्रधानांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

संचारबंदीचे उल्लंघन करून कराटेचा वर्ग चालवणार्‍या शिक्षिकेला पोलिसांनी केला दंड !

तहसीलदार ज्योती देवरे आणि पोलीस निरीक्षक घनःश्याम बळप यांनी ठिकठिकाणी फिरून गर्दी असलेल्या ठिकाणांवर जाऊन कारवाई केली. 

कुराणातील आयाते हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

‘कुराणातील या आयातांमुळे आतंकवादाला प्रोत्साहन मिळते’, असे रिझवी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते. या याचिकेमुळे रिझवी यांना जीवे मारण्यासाठी ११ लाख रुपयांचे पारितोषिकही घोषित करण्यात आले आहे.