(म्हणे) भारताचे पॅलेस्टाईनला समर्थन हा त्याच्या परराष्ट्र नीतीचा महत्त्वाचा भाग ! – सुषमा स्वराज

पॅलेस्टाईनची जनता आणि पॅलेस्टाईनचा उद्देश यांसाठी भारताच्या  समर्थनाला कधीही दुय्यम ठरवले जाऊ शकत नाही. पॅलेस्टाईनला भारताचे समर्थन हे स्वातंत्र्यापूर्वीपासून आहे आणि तो त्याच्या पररराष्ट्र नीतीचा महत्त्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्राच्या सभेत केले.

भारताने डोकलाम प्रकरणावरून धडा घ्यावा ! – चीनचा हेकेखोरपणा कायम

चीन आणि भारत या दोन्ही देशांनी त्यांचे सैन्य डोकलाममधून मागे घेतले आहे, असे २८ ऑगस्टला भारताने घोषित केले; मात्र त्याच वेळेस चीनने आमची डोकलाम येथे गस्त चालू रहाणार, असे लगेचच घोषित केले.

वाद मिटला, आव्हान कायम !

डोकलाम प्रश्‍नावरून तब्बल ७५ दिवसांनंतर शेवटी भारत आणि चीन यांच्यात आशादायी चर्चा होऊन आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला.

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांचे तंबू तोडले !

उत्तराखंडच्या बाराहोती सीमेवर चीनच्या सैनिकांनी भारतीय गुराख्यांना धमकावून त्यांचे येथे असणारे तंबू तोडून टाकले. तसेच त्यांना डोंगरावरून खाली जाण्यासाठी बाध्य केले.

डोकलामप्रश्‍नी जपानचा भारताला पाठिंबा

सीमेतील सध्याच्या स्थितीत कोणीही बलपूर्वक पालट करू नये, असे डोकलाम प्रकरणी जपानने भारताला पाठिंबा देतांना म्हटले आहे.

तुळजापूर येथे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी राष्ट्राभिमान्यांचे घोषणा देऊन प्रबोधन !

भारतियांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून राष्ट्रकर्तव्य पार पाडायला हवे. यासाठी सर्वांनीच आंदोलनात सहभागी होऊया.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ! – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

भारतीय सीमेत घुसखोरी करणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात आंदोलने, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत.

भारताला एकही शत्रू नसल्याची परराष्ट्र मंत्रालयाची धक्कादायक माहिती !

भारताला एकही शत्रू नसल्याची धक्कादायक माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी देशाच्या शत्रूराष्ट्रांच्या सूचीत कोणती नावे आहेत, तसेच त्यांचा समावेश कधीपासून करण्यात आला होता ?

श्रीलंकेच्या नौदलाकडून भारताच्या ४९ मासेमार्‍यांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने हवेत गोळीबार करत समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या भारताच्या ४९ मासेमारांना अटक केली आहे.

युद्ध नको असेल, तर डोकलाममधून सैन्य तात्काळ मागे घ्यावे ! – चीनच्या सैन्याची धमकी

भारत युद्ध किंवा संघर्ष टाळण्यास इच्छुक असेल, तर त्यांनी तात्काळ डोकलाममधून सैन्य माघारी घ्यावे, अशी धमकी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे कर्नल ली यांनी एका पत्रकार परिषदेतून दिली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now