Indian Worker Death Case : सतनाम सिंह यांच्‍या मृत्‍यूला उत्तरदायी असणार्‍यांवर कारवाई करा !

भारताची इटली सरकारकडे मागणी

भारतीय नागरिक सतनाम सिंह

रोम (इटली) – भारताने इटलीसमोर भारतीय नागरिक सतनाम सिंह यांच्‍या मृत्‍यूसाठी उत्तरदायी असणार्‍यांविरूद्ध कारवाई करण्‍याची मागणी केली. परराष्‍ट्र मंत्रालयाचे सचिव मक्‍तेश परदेशी यांनी इटलीचे परराष्‍ट्रमंत्री लुईगी मारिया विग्‍नली यांच्‍यासमोर हे प्रकरण उपस्‍थित केले. सतनाम सिंह इटलीमध्‍ये एका शेतामध्‍ये काम करत असतांना त्‍यांचा हात कापला गेला; मात्र मालकाने त्‍यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्‍याऐवजी रस्‍त्‍याच्‍या कडेला नेऊन सोडून दिले. काही घंट्यानंतर त्‍यांना रुग्‍णालयात भरती करण्‍यात आले; मात्र त्‍यांचे प्राण वाचू शकले नव्‍हते.