Sheikh Hasina Meet PM Modi : बांगलादेशाच्‍या पंतप्रधान हसीना यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

बांगलादेशाच्‍या पंतप्रधान हसीना व पंतप्रधान मोदी

नवी देहली – बांगलादेशाच्‍या पंतप्रधान शेख हसीना २ दिवसांच्‍या भारत दौर्‍यावर आहेत. हसीना यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. तत्‍पूर्वी त्‍यांनी परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची भेट घेतली. त्‍या दोघांमध्‍ये दोन्‍ही देशांच्‍या द्विपक्षीय संबंधांवर सखोल चर्चा झाली. हसीना यांनी ९ जून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या शपथविधी सोहळ्‍यालाही उपस्‍थित राहिल्‍या होत्‍या.

संपादकीय भूमिका

भारताचे बांगलादेशाशी चांगले संबंध असल्‍याचे दिसत आहे. त्‍यातही पंतप्रधान शेख हसीना यांच्‍याशी अधिक चांगले संबंध आहेत; मात्र तरीही बांगलादेशात हिंदूंची स्‍थिती दयनीय आहे. हसीना यांच्‍याच पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अत्‍याचार करत आहेत. ‘भारत सरकार हसीना यांच्‍यावर हिंदूंच्‍या रक्षणासाठी दबाव का निर्माण करत नाही ?’, असा प्रश्‍न उपस्‍थित होतो !