बेंगळुरू (कर्नाटक) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ एप्रिल या दिवशी राज्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. तसेच ‘टायगर प्रकल्पा’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ते मैसुरू येथे कार्यक्रमात सहभागी झाले.
कर्नाटक: “बांदीपुर टाइगर रिजर्व के दौरे पर PM मोदी, हाथियों को खिलाए गन्ने।”#Bandipur #BandipurNationalPark #PMModi @narendramodi pic.twitter.com/lhdtU0KV7P
— The Hint News (@TheHintNews) April 9, 2023
त्यांनी देशातील वाघांची नवीन आकडेवारी घोषित केली. या आकडेवारीनुसार देशात ३ सहस्र १६७ वाघ आहेत. पंतप्रधान मोदी यांनी नंतर तमिळनाडूच्या सीमेला लागून असलेल्या मुदुमलाई नॅशनल पार्कला भेट दिली. येथील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पलाही त्यांनी भेट दिली.