पर्यावरणारच्या संवर्धनासाठी आयटी इंजिनियरविषयी वाचा प्रेरणादायी माहिती !
दमोह (मध्यप्रदेश) – बिघडलेल्या पर्यावरणाची चिंता दमोह येथील २५ वर्षीय आयटी अभियंता डॉ. छयन लोहा यांना गुजरातमधील लाखो रुपयांच्या नोकरीचा त्याग करून गावात आणण्यास कारणीभूत ठरली आहे. गावात त्यांनी गोशाळा चालू केली. शेणापासून विटा बनवल्या. या विटांचा वापर करून त्यांनी थंड-उष्ण आणि विषाणूमुक्त घर बांधले. राज्यातील अशा प्रकारचा हा दुसरा प्रयोग आहे. यापूर्वी ग्वाल्हेरमध्ये असे घर बांधण्यात आले होते.
सौजन्य: Amar Ujala MP-CG
आयटी अभियंता आणि आयुर्वेदातून पंचगव्याचे शिक्षण घेतलेले डॉ. लोहा म्हणाले,
१. माझे गुरु डॉ. एस्.डी. मलिक यांच्याकडून गायीच्या शेणापासून विटा आणि ‘वेदिक प्लास्टर’(भिंतीचा गिलावा) बनवण्याचे कौशल्य शिकून घेतले.
२. शेणापासून बनवलेल्या या विटा प्रयोगशाळेच्या चाचणीमध्ये सामान्य विटांपेक्षा स्वस्त आणि बळकट असल्याचे आढळून आले. तसेच या विटा पूर्णपणे विषाणूमुक्त आहेत.
३. वेदिक घरे थंड आणि उष्णता यांपासून मुक्त असतात. शेणांच्या विटांमध्ये माती, पेंढा आणि नैसर्गिक साहित्य वापरले जाते. या गोष्टी उष्णता शोषून घेतात आणि अतिशय धीम्या गतीने बाहेर सोडतात. त्यामुळे त्या विटा बराच काळ तापमान नियंत्रणात ठेवतात.