३० नोव्हेंबर या दिवशी नवाब मलिक यांच्या जामिनावरील सुनावणी !

नवाब मलिक

मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणात अटकेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर २४ नोव्हेंबर या दिवशी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. नवाब यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता ३० नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. गोवावाला कंपाऊंड खरेदी आर्थिक अपहाराच्या प्रकरणी नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत.