कर्नाटकातील पर्यटनासंबंधीचे फलक फाडले !
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याने मराठीजनांचा रोष उफाळून आला आहे. ‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे फलक विमानतळावर लावण्यात आले.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर हे फलक लावल्याने मराठीजनांचा रोष उफाळून आला आहे. ‘सी कर्नाटका ए न्यू’ असे कर्नाटक पर्यटन विभागाचे फलक विमानतळावर लावण्यात आले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मी एक जोरदार, तसेच धाडसी माणूस वाटलो. त्यामुळे त्यांनी मला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ठाण्यात सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली असून येत्या ६ मासांमध्ये ठाणे खड्डे आणि कचरा मुक्त करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना दिले.
‘जी २०’ परिषदेच्या १६१ बैठका भारतात होणार असून त्यांतील १४ बैठका महाराष्ट्रात होणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, संभाजीनगर आणि नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होतील.
सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.
‘शिवसेना’ हे पक्षाचे नाव आणि या पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ यांवर नेमका हक्क कुणाचा ? याविषयी १२ डिसेंबर या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.
हिंदु धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा ‘शास्त्र’ म्हणून अभ्यास केला जातो. याउलट ज्योतिषशास्त्राचा काडीचाही अभ्यास न करता त्यावर टीका करणारेच खर्या अर्थाने अंधश्रद्धाळू आहेत !
येत्या ३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगड येथे मोठ्या दिमाखात ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.
येथील पुणे-सातारा रस्त्यावरील कात्रज-आंबेगावजवळील नवले पुलावर २० नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजता मुंबईच्या दिशेने जात असलेल्या टँकरचा भीषण अपघात झाला होता. हा टँकर सातार्याहून मुंबईच्या दिशेने येत होता.
राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्तीवेतनामध्ये दुपटीने वाढ करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि गोवा मुक्तीसंग्राम या लढ्यात सहभागी सैनिकांना दरमहा २० सहस्र रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.