‘माझ्या मुलाचा ‘एन्काऊंटर’ करा’, असा पुढार्‍यांचा पोलिसांना आदेश असल्याचा ललित पाटील याच्या आईचा आरोप !

आरोपी ललित पाटील (उजवीकडे)

पुणे – राजकीय नेत्यांनी पोलिसांना सांगितले आहे की, ललित जिथे असेल तिथे त्याचा ‘एन्काऊंटर’ (ठार करणे) करा. टीव्हीला दाखवल्यापासून आम्हाला धक्काच बसला आहे. मुलाने असे केले, ते चुकीचे आहे. या गोष्टीची मला कल्पना नव्हती, अशी प्रतिक्रिया ललित पाटील यांच्या आईने ‘टीव्ही-९’ या वाहिनीशी बोलतांना दिली आहे.

ललितचा भाऊ भूषण याने ‘रसायन अभियांत्रिकी’ शिक्षण पूर्ण केले आहे. त्याचा जवळचा मित्र अभिषेक बलकवडे यांनी नाशिक परिसरातील शिंदे गावात ‘मॅफीड्रोन’ सिद्ध करण्याचा कारखाना चालू केला होता. ललित हा ‘ससून’ रुग्णालयातून पसार झाल्यापासून पोलीस त्याच्या शोधात आहेत. ललितचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना नेपाळच्या सीमेवरून पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. ललित आणि भूषण यांनी अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशातून अधिक प्रमाणामध्ये सोने आणि भूमी खरेदी केल्याचे अन्वेषणातून समजले आहे.