भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी अधिवक्ते यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी अधिवक्त्यांनी षड्यंत्र रचले होते.

राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीजजोडणी तोडण्यावरून विधानसभेत गदारोळ !

कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी गावातील शेतकरी सूरज जाधव यांनी फेसबूकवरून त्यांच्या आत्महत्येचे थेट प्रक्षेपण करून आत्महत्या केली. याचे पडसाद ७ मार्च या दिवशी विधानसभेत उमटले.

आपण कितीही श्रीमंत असलो, तरी प्रत्येकाने मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ६ मार्च या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या २ शहरांतील पिंपरी ते फुगेवाडी अन् गरवारे स्थानक ते आनंदनगर या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एम्.आय.टी. महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेच्या वेळी ते बोलत होते.

राज्यपालांचे काम राज्यघटनेनुसारच चालते ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्यपालांवर टीका करायची, त्यांच्या विरोधात बोलायचे, एक प्रकारे त्यांच्या विरोधात कथानक सिद्ध करायचे. हा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल हे एका संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे आणि ती राज्यघटनेचेच काम करते.

पोलीसदलावरील राजकीय दबाव महाराष्ट्राला अधोगतीला नेणारा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “डोंबिवलीतील भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर आक्रमण होऊन ४ दिवस उलटले, तरी पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही, ही शोकाची आणि गंभीर गोष्ट आहे.

‘ओबीसी’ आरक्षणावरून विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण घालवले आहे. एकही निवडणूक आरक्षणाविना होऊ नये, त्यासाठी लागले तर कायदा सिद्ध करा.

नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी भाजपचे पुन्हा विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यावर ४ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झरवळ यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून सरकारला घेरले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राच्या मागणीसाठी विधीमंडळात संघर्ष करू ! – देवेंद्र फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारी पक्षाकडून आयोजित करण्यात येणार्‍या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.