दक्षिण मुंबईतील हवा देहलीपेक्षा अधिक विषारी !

देहलीपेक्षा दक्षिण मुंबईतील हवा अधिक प्रदूषित झाल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. मुंबईतील सध्याच्या वातावरणामुळे श्वसनाचे आजार असलेल्यांच्या श्वासाच्या समस्येत वाढ होते.

जातीयवादी शक्ती परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत ! – शरद पवार

‘‘ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी या सत्तेचा अपवापर कसा केला, हे जनतेने पाहिले आहे. सत्ता मिळत नसल्याने नैराश्यातून भाजप महाविकास आघाडीवर आरोप करत आहे. त्याला फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.

पंचतारांकित उपाहारगृहांतील वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून शेतकर्‍यांच्या प्रदूषणावर बोलले जात आहे ! – सर्वोच्च न्यायालय

‘आपण या वास्तवाकडेही डोळेझाक करतो की, बंदी असूनही फटाके सर्रासपणे फोडले जात आहेत’, असेही न्यायालयाने या वेळी म्हटले.

प्रदूषणावर उतारा !

गेल्या दीड-दोन शतकांत मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे पृथ्वी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यासाठी आता केले जाणारे प्रयत्न हे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखे आहेत. त्याचा किती परिणाम होणार ? हा येणारा काळच ठरवील.

गेल्या २० वर्षांत पोलीस कोठडीत १ सहस्र ८८८ जणांचा मृत्यू

पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण केली जाते, तसेच त्यांचा छळ केला जातो, त्यात अनेकांचा मृत्यू होतो, तरीही या प्रकरणी कुणाला शिक्षा होत नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! कोठडीतील मृत्यू म्हणजे पोलिसांनी केलेली हत्याच नव्हे का ? सरकारने याकडे गांभीर्याने पाहून उत्तरदायींना शिक्षा केली पाहिजे !

वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कठोर दळणवळण बंदी लावू शकतो ! – देहली सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिपादन

सरकारने पुढे म्हटले की, दळणवळण बंदीमुळे हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडेल, असेही नाही. वायू प्रदूषणाच्या सूत्रावर व्यापक स्तरावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.

प्रदूषित देहली !

सर्व प्रकारच्या प्रदूषणाविषयी जनजागृती करून त्यावरील उपायांमध्ये जनतेचा सहभाग अधिकाधिक करून घ्यावा. राजकीय इच्छाशक्ती दाखवून उपाययोजनांची कठोरपणे कार्यवाही करणे आणि पर्यावरणपूरक जीवनपद्धत बनवणे आवश्यक आहे.

देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर !

भारताची राजधानीच प्रदूषित असेल, तर अन्य शहरांची स्थिती काय असेल, याची कल्पना येते ! या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांनी वाहनांचा वापर ३० टक्के न्यून करावा ! – केंद्रीय प्रदूषण मंडळाचा सल्ला

देहलीत वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देहलीतील सरकारी आणि खासगी कार्यालयांना त्यांच्या वाहनांचा वापर किमान ३० टक्क्यांनी न्यून करण्याचा सल्ला दिला आहे.