लोकसभेतील ४६ टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी गुन्ह्यांची नोंद !
असे खासदार कधी जनतेला सुरक्षित आणि न्यायाचे राज्य देतील का ? हा लोकशाहीचा दारूण पराभव नव्हे का ?
असे खासदार कधी जनतेला सुरक्षित आणि न्यायाचे राज्य देतील का ? हा लोकशाहीचा दारूण पराभव नव्हे का ?
इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, ज्या पक्षाने प्रभु श्रीरामाची भक्ती केली त्या पक्षाला आता २४१ जागांवर अडून बसावे लागले. अहंकारी लोकांना देवाने मोठा पक्ष बनवले; परंतु ताकद दिली नाही.
भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी १३ जून या दिवशी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी पूजा केली, तसेच एका कागदावर २१ वेळा ‘ॐ श्री राम’ असा जप लिहिला.
सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारकडून चालू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेत पालट करण्याविषयी विचारमंथन चालू झाले आहे. केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने १० प्रमुख मंत्रालयांच्या सचिवांकडे या योजनेचा आढावा घेण्याचे दायित्व सोपवले आहे.
द्विवेदी सध्या सैन्यदलाचे उपप्रमुख असून चीनसमवेत सीमेवरून चालू असलेल्या चर्चेत त्यांचा सक्रीय सहभाग आहे.
नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून ‘योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवा’, असे आवाहन केले होते.
२१ जून या दिवशी देशात ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ चालू केला होता. यंदा १० वा ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा केला जाणार आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. भाजप सरकारच्या मागील कार्यकाळात प्रमुख खाती ज्यांच्याकडे होती त्यांना तिच खाती पुन्हा देण्यात आली आहेत.
इंडी आघाडीवाल्यांना अंदाज नाही की, ते हळूहळू बुडत होते आणि आता ते गतीने बुडणार आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.