(म्हणे) ‘माझी कालीमाता हिंदुत्व उद्ध्वस्त करते !’

लीना मणीमेकलई यांचे श्री महाकालीमातेविषयी आक्षेपार्ह ट्वीट

डावीकडे लीना मणीमेकलई

नवी देहली – ‘काली’ माहितीपटाच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांनी नवीन ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ‘माझी काली ‘क्वीर’ (विचित्र) आहे. ती एक मुक्त आत्मा आहे. ती पितृसत्ताकतेवर थुंकते. ती हिंदुत्व उद्ध्वस्त करते. ती भांडवलशाहीचा नाश करते आणि तिच्या सहस्रो हातांनी ती सर्वांना आलिंगन देते’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

सातत्याने हिंदूंच्या देवता आणि हिंदू यांच्याविषयी आपेक्षार्ह विधाने करणार्‍या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी भारत सरकारने कॅनडा सरकारवर आता दबाव आणला पाहिजे !