देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

हिंदूंमध्ये आता जागृती झाली असून त्यांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी अजमेर दर्गा आणि आता निझामुद्दीन दर्गा येथे जाणे अल्प केले आहे. पुढे ते पूर्णच बंद होईल !

भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला

भारतात केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुष्कळ डोकेदुखी, शरिराला सूज आणि थकवा अशी लक्षणे आढळून येतात.

महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली.

कावड यात्रेकरूंवर जिहाद्यांकडून आक्रमणाचा धोका !

आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी ‘जर कावड यात्रेकरूंवर आक्रमण झाले, तर देशातून एकाही हज यात्रेकरूला हजला जाऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली असती !

लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची घोषित !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रशासनाचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून चालू होत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा सचिवालयाकडून ‘असंसदीय’ शब्दांची सूची जाहीर करण्यात आली आहे.

देशातील २५ राज्यांत पावसामुळे २१८ जणांचे बळी : सर्वत्र जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांत पूरस्थिती आणि दरड कोसळणे यांमुळे २१८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांसह देशातील २५ राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे.

आजपासून ७५ दिवस विनामूल्य ‘वर्धक मात्रा’ ! – केंद्र सरकारची घोषणा

केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) विनामूल्य देण्याची घोषणा केली.

नवीन संसद भवनाच्या अशोक स्तंभावरील सिंहांच्या चेहर्‍यात पालट केल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

विरोधकांचे म्हणणे आहे की, अशोक स्तंभाच्या सिंहांना क्रूर आणि आक्रमक बनवण्यात आले आहे.

देशभरात आतापर्यंत ९ टक्क्यांहून अधिक पाऊस

पुढील ४ दिवस ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश आणि केरळ येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मनमानी आणि अविचाराने होणारी अटक, ही वसाहतवादी मानसिकता दर्शवते ! – सर्वोच्च न्यायालय

आरोपीच्या नियमित जामीन अर्जावर साधारतः २ आठवड्यांच्या आत आणि अंतरिम अर्जावर ६ आठवड्यांच्या आत निर्णय झाला पाहिजे. कुणालाही अटक करण्यापूर्वी भारतीय दंड सहितेच्या कलम ४१ आणि ‘४१ अ’चे पालन केले पाहिजे