चिनी आस्थापन ‘विवो’वरील धाडीनंतर तिचे दोन महासंचालक देश सोडून पळाले !

नवी देहली – भ्रमणभाष संच बनवणारे चिनी आस्थापन विवोच्या येथील कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकल्यानंतर तिचे दोन महासंचालक देशातून पळून गेल्याचे समोर आले आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या संदर्भात विवोच्या देशातील ४४ ठिकाणी दोन दिवसांपूर्वी धाडी घालण्यात आल्या होत्या. या आस्थापनावर सहस्रो रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप आहे.

संपादकीय भूमिका

देश सोडून पळून जाईपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ?