देहलीतील फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांना ठार मारण्याची धमकी

फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम मुफ्ती मुकर्रम

नवी देहली – येथील फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा) मुफ्ती मुकर्रम यांना अज्ञाताने दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी दिली. गेल्या काही दिवसांत ४ वेळा धमकीचे दूरभाष आल्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस याची चौकशी करत आहेत.

संपादकीय भूमिका

गेल्या काही काळापासून कट्टरतावादी मुसलमानांकडून हिंदूंना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. अशा वेळी ‘समतोल’ साधण्यासाठी त्यांच्याच धर्मबांधवांनी इमामांना धमक्या देऊन ‘आम्हालाही धमक्या मिळतात’ असे दाखवण्याचा प्रयत्न केला असेल, तर यात आश्‍चर्य वाटू नये !