नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ एप्रिलपर्यंत वाढ

नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी निगडित आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मलिक हे आधी ‘ईडी’ कोठडीत आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते.

पवारसाहेब हेच ‘दाऊदचा माणूस’ असू शकतात ! – आमदार नीतेश राणे, भाजप

पवारसाहेब हेच दाऊदचा माणूस असू शकतात, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ९ मार्च या दिवशी ‘ट्वीट’ करून केला आहे.

नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विधानसभेत विरोधकांचा गदारोळ !

विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झरवळ यांनी कामकाजाला प्रारंभ केल्यानंतर भाजपच्या आमदारांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्राची मागणी करून सरकारला घेरले.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांचे विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या त्यागपत्रासाठी विरोधकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे.

हे दाऊदचे अराष्ट्रवादी समर्थक !

मोठा गाजावाजा करून कारवाई चालू करायची, थोडे केल्यासारखे काहीतरी दाखवायचे आणि नंतर साटेलोटे झाले की, काढता पाय घ्यायचा, हे या तरी प्रकरणात होऊ नये. भारतीय जनतेला विसराळूपणाचा शाप आहे. आपल्याकडे मोठी प्रकरणेही एवढी घडत असतात की, पुढचे काही घडले की, जनता जुने सर्व विसरून जाते.

मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत बाँबस्फोट करणार्‍या आतंकवाद्यांकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई येथे बाँबस्फोट करणार्‍यांसमवेत भूमी खरेदीचा व्यवहार का केला ? एखाद्या मंत्र्यांनी आतंकवाद्याकडून भूमी खरेदी करण्याचे कारण काय ?

दाऊदचा हस्तक ठाणे पोलिसांच्या कह्यात !

ठाणे नगर पोलिसांनी मोक्काअन्वये शिक्षा भोगत असलेला दाऊदचा हस्तक तारीक परवीन याचा तळोजा कारागृहातून कह्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

दाऊद इब्राहिम याला भारतात आणून फासावर लटकवा !  

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. देशाच्या मुळावर उठलेल्या अशा आतंकवाद्यांना सरकारनेच भारतात आणून फासावर लटकवावे !