दाऊद इब्राहिम याला भारतात आणून फासावर लटकवा !  

जंतरमंतर येथे आंदोलनाद्वारे हिंदू सेनेची मागणी

वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. देशाच्या मुळावर उठलेल्या अशा आतंकवाद्यांना सरकारनेच भारतात आणून फासावर लटकवावे !

नवी देहली – आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याला भारतात आणून फासावर लटकवण्यात यावे, या मागणीसाठी येथील जंतरमंतर येथे हिंदू सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी १२ मार्च या दिवशी आंदोलन केले. १२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा दाऊद सूत्रधार असल्याने ही मागणी करण्यात आली.
हिंदू सेनेचे प्रमुख विष्णु गुप्ता म्हणाले की वर्ष १९९३च्या स्फोटामधील बळींना २८ वर्षांनंतरही अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दाऊदला भारतात आणून फासावर लटकवण्याची मागणी आम्ही करत आहोत.