भ्रष्टाचार जीवनाची एक पद्धत बनली आहे !

माजी सरन्यायाधिशांच्या या विधानातून ‘सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे’, असाच अर्थ निघतो. यातून भारत कोणत्या दिशेने चालला आहे, हे स्पष्ट होते ! ही स्थिती केवळ धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते, हे लक्षात घ्या !

बीड जिल्ह्यातील देवस्थान भूमी घोटाळाप्रकरणी चौकशीसाठी समिती स्थापन !

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे.

मंदिरात दर्शनासाठी लागणार्‍या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार !

श्री सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी देण्यात येणार्‍या ‘क्यू.आर्. कोड’चा काळाबाजार करणार्‍यांवर दादर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ भ्रमणभाष कह्यात घेतले आहेत; मात्र अद्याप अटक नाही.

(म्हणे) ‘अन्य भाषांतील (परकीय) शब्द घेतल्याविना आपली भाषावृद्धी होणार नाही !’ – रामदास भटकळ, ज्येष्ठ साहित्यिक

‘परकीय शब्द वापरणे, म्हणजे ‘औरस मुले मारून अन्य मुले दत्तक घेत सुटणे’, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी म्हटले होते, हे साहित्यिक लक्षात घेतील का ?

मागील १७ वर्षांत मुंबई महानगरपालिकेतील ५७ लाचखोर कर्मचार्‍यांना कामावरून काढले !

यामध्ये २०० रुपयांपासून ते २ लाख ७५ सहस्र रुपयांपर्यत लाच घेतल्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांना माहिती अधिकाराखाली ही माहिती प्राप्त झाली आहे.

हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पोलिसांकडून पैशांची मागणी !

असे पोलीस पोलीस विभागाला कलंकच आहेत. अशांना कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे.

वाहनचालकांकडून पैसे उकळणार्‍या पोलिसांचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून ‘स्टिंग ऑपरेशन’ !

भ्रष्टाचाराने पोखरलेली पोलीस यंत्रणा !

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्तीचे पैसे मागणार्‍या महाविद्यालयांवर कारवाई होणार !

शुल्क भरण्यासाठी आग्रह धरून कागदपत्रांचीसुद्धा अडवणूक करण्यात येत आहे, अशा तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक यांनी सरकारकडे, तसेच राज्यातील समाजकल्याण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांकडे केल्या आहेत.

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील कार्यालयावर ‘ईडी’ची धाड !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथील ‘शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रामनगर साखर कारखाना खरेदी, तसेच कारखान्यांच्या भूमीत भ्रष्टाचार केला आहे’, असा आरोप काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता.