
बीड – बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरणात नोंद झालेल्या २ गुन्ह्यांच्या अन्वेषणासाठी विशेष तपास पथकाची (एस्.आय.टी.) समिती स्थापन करण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत हे अन्वेषण अधिकारी म्हणून काम करणार आहेत. बीड जिल्ह्यातील देवस्थान समितीचे घोटाळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्यात देवस्थान भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी २ वेगवेगळे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात महसूल विभागाच्या काही अधिकार्यांनाही अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचे अन्वेषण करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी समिती स्थापन केली आहे.
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी