धर्मांतर रोखण्याचा एक मूलभूत उपाय : धर्मशिक्षण !
आजच्या घडीलाही शैक्षणिक संस्था, चर्च, रुग्णालये, अन्य सेवाभावी संस्था यांच्या नावाखाली ख्रिस्त्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात छुपे धर्मांतर चालू आहे. जसे ते डोंगराळ आदिवासी भागांत आहे, तसे ते महानगरांतही आहे. जसे अगदी गरीब लोकांमध्ये आहे, तसेच एका अर्थाने आंग्लाळलेल्या अतीश्रीमंतांमध्येही ते वैचारिकदृष्ट्या झाले आहे.