चीनचा प्रखर विरोधी असलेल्या तैवानचे सैन्यदलप्रमुख आणि बिपिन रावत या दोघांच्या हेलिकॉप्टर अपघातांमध्ये साम्य !

संरक्षणतज्ञांकडून चीनच्या भूमिकेवरून प्रश्‍न उपस्थित

श्रीलंका सरकारच्या विरोधात चिनी आस्थापनाकडून आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला प्रविष्ट

चीनच्या एकूणच वस्तूंची गुणवत्ता सुमार असल्याचा अनुभव जगातील अनेक देशांनी आतापर्यंत घेतला आहे. चीनला श्रीलंकेने अशा प्रकारे माल परत पाठवून दिलेले उत्तर अन्य देशांना शिकण्यासारखे आहे !

हिंदी महासागरातील चीनच्या युद्धनौकांवर नौदलाचे लक्ष ! – नौदलप्रमुख आर्. हरिकुमार

लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैन्यासमवेतच्या संघर्ष आणि तणाव यांच्या घटनांनंतर हिंदी महासागरात भारताचे नौदल सतर्क आहे. चीनच्या प्रत्येक नौकेवर लक्ष ठेवले जात आहे, अशी माहिती भारताचे नवनियुक्त नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर्. हरिकुमार यांनी दिली.

भारताच्या तीव्र विरोधानंतर श्रीलंकेकडून चीनच्या आस्थापनाला दिलेला सौरऊर्जा प्रकल्प रहित

श्रीलंकेकडून एका चिनी आस्थापनाला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्यावरून भारताने जानेवारीमध्ये श्रीलंकेचा निषेध केला होता.

शी जिनपिंग यांना आयुष्यभर चीनचे राष्ट्राध्यक्ष ठेवणारा कायदा !

शी जिनपिंग यांना तीनदा आणि आयुष्यभरच चीनचे सर्वेसर्वा म्हणून रहाण्याची इच्छा आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी जे केले, नेमके तेच शी जिनपिंग करू इच्छित आहेत. ते स्वत:ला चीनचे युगपुरुष समजतात आणि त्यांना वाटते की, तेच चीनला महाशक्ती बनवू शकतील. ते हे करू शकतील कि नाही, हा भाग वेगळा !

अमली पदार्थांमुळे राष्ट्रच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर ! – प्रा. महेंद्र नाटेकर, स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समिती

अमली पदार्थांपासून देश वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याची आवश्यकता एका प्राध्यापकाच्या लक्षात येते; मात्र स्वातंत्र्यानंतर सर्व यंत्रणा हाताशी असलेली आतापर्यंतची सरकारे, प्रशासन यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत हे दुर्दैवी म्हणावे लागेल !

चीनची भिंत हीच त्याची मूळ सीमा, तर उर्वरित चीन हा विस्तारवाद ! – डॉ. इंद्रेश कुमार, प्रचारक, रा.स्व. संघ

चीनची वास्तविक सीमा चीनची भिंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही चीनचे सध्याचे क्षेत्रफळ आहे, तो चीनचा विस्तारवाद आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांनी येथे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचकडून आयोजित केलेल्या एका संमेलनात केले.

चीनची लडाख सीमेवर महामार्ग बांधणी चालू !

भारताने सीमेजवळ बांधकाम केल्यास चीन भारतामुळे सीमेवर तणाव निर्माण होत असल्याचा कांगावा करतो, मग चीन असे बांधकाम करत असतांना भारत गप्प का बसतो ?

(म्हणे) ‘भारतीय अधिकार्‍यांच्या विधानांमुळे सीमेवर तणाव वाढू शकतो !’ – चीनचा थयथयाट

सीडीएस् जनरल बिपिन रावत यांनी काही चुकीचे सांगितलेले नाही; मात्र चीनला मिरच्या झोंबल्यामुळे तो थयथयाट करत आहे. यापेक्षा चीनने सीमेवरील कुरापती बंद कराव्यात आणि अक्साई चीन भारताला परत द्यावा !

सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या चीनचा जन्मदर घसरला

‘एक मूल धोरण’ शिथिल केल्यानंतरही चिनी जनता मूल जन्माला घालण्यास सिद्ध नाहीत !