रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसलेली असतांना साधिकेला आलेली अनुभूती

मारुतिराया मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘तू अजूनही स्थुलातच अडकली आहेस का ? अगं, मी सूक्ष्मातून तुझ्याकडेच पहात आहे.’ तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी त्याची क्षमायाचना केली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासांविषयी लिहून पाठवल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. त्यानुसार नामजपादी उपाय केल्यावर २ मासांत माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले.

‘श्री हनुमते नमः ।’ या नामजपाच्या संदर्भात श्री. संदीप शिंदे आणि सौ. स्वाती संदीप शिंदे यांना आलेल्या अनुभूती

‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’मधील ‘श्री हनुमते नमः ’ हा नामजप चालू होईपर्यंत अगदी एका मिनिटात कुत्र्यांचे भुंकणे थांबलेले असते, तर काही वेळा खिडकीजवळ असलेली कुत्री दूरवर जाऊन भुंकत असल्याचे लक्षात येते.

पू. सीताराम देसाई साधकांसाठी नामजप करतांना कु. शौर्य गांगण (वय १० वर्षे) याचा नामजप भावपूर्ण होऊन त्याचे ध्यान लागणे

१४.८.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. देसाईकाका साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी कु. शौर्य नामजप करण्यास बसला होता. तेव्हा त्याचा नामजप भावपूर्ण होऊ लागला.

‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

सप्तर्षींच्या आज्ञेनुसार ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करतांना सनातनच्या आश्रमातील सौ. आरती पुराणिक यांना आलेल्या अनुभूती

‘मी ‘प.पू. डॉक्टर’ हा नामजप करण्यास आरंभ केल्यानंतर ‘माझा नामजप अखंड चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. अन्य वेळी बसून नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक आणि निरर्थक विचार येतात.

महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने धनबाद येथे ३ दिवसांचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप पार पडला !

कार्यक्रमात शिवाचा सामूहिक नामजप करतांना एका महिला जिज्ञासूला ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्‍या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.

असात्त्विक (रिमिक्‍स) आणि सात्त्विक ‘ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप ऐकल्‍यावर व्‍यक्‍तीवर होणारा परिणाम अभ्‍यासण्‍यासाठी केलेली वैज्ञानिक चाचणी !

‘रिमिक्‍स’ पद्धतीचा आणि काळानुसार भावपूर्ण केलेला ‘ॐ नमः शिवाय ।’ या दोन नामजपांचा तुलनात्‍मकदृष्‍ट्या केलेला अभ्‍यास . . .

कु. प्रतीक्षा हडकर यांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्‍या संदर्भात आलेल्‍या अनुभूती

कधी कधी मला फार त्रास होत असेल; काळजी वाटत असेल, तर त्‍या वेळी मी नामजप करते आणि मधेमधे दैनिकातील छायाचित्रांना आत्‍मनिवेदन करून रडते अन् मन मोकळे करते. त्‍यांना आत्‍मनिवेदन केल्‍यामुळे मला हलके वाटतेे.

साधिकेला झालेले विविध शारीरिक त्रास, तिने केलेले विविध उपचार आणि सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्‍यावर तिला झालेले लाभ !

सद़्‍गुरु काकांच्‍या कृपेने अर्ध्‍या घंट्यात माझा पाय हलका जाणवून फरक पडला. एका घंट्याने मी हळूहळू उठून आधार घेऊन चालू लागले. ‘हे उपाय म्‍हणजे आपत्‍काळातील एक प्रकारे संजीवनीच आहे’, असे मला वाटत होते.