‘१४.८.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमात पू. देसाईकाका साधकांसाठी नामजपादी उपाय करत होते. त्या वेळी कु. शौर्य नामजप करण्यास बसला होता. तेव्हा त्याचा नामजप भावपूर्ण होऊ लागला. त्या वेळी त्याचे ध्यान लागले होते आणि त्याला ‘नामजप कधी संपला’, ते कळलेच नाही. नामजप संपल्यावरही त्याला तो आतून ऐकू येत होता. त्या वेळी ‘त्याच्या शरिरावर रोमांच आले होते’, असे त्याने सांगितले.’
– सोनाली गांगण (कु. शौर्य गांगण याची आई), रत्नागिरी. (१०.८.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |