१. कु. प्रतीक्षा यांच्या जवळील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकातील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्रांत पालट होणे
१ अ. ‘काही दिवसांपासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील त्यांचे मुख गुलाबी दिसू लागले आहे, तर त्यांचे डोळे हलल्यासारखे वाटत आहेत.
१ आ. मंद प्रकाशात दैनिकातील छायाचित्रात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे हात पांढरेशुभ्र दिसू लागणे आणि दिवसाच्या उजेडातही तो पालट दिसणे : १.४.२०२२ च्या रात्री मी खोलीतील लहान दिव्याच्या मंद प्रकाशात नामजप करण्यास बसले होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे एकत्रित छायाचित्र असलेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक मी स्वतःजवळ ठेवला होता. नामजपाला आरंभ केल्यावर काही वेळातच मला त्या अंकातील छायाचित्रातील श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचे हात पांढरेशुभ्र (प्रकाशमान) झाल्याचे दिसले. मी नामजप करत असतांना ते काही वेळ पहात होते. दुसर्या दिवशी मी दैनिकातील ते छायाचित्र उजेडात घेऊन पाहिले, तर मला खरंच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या हातात वरीलप्रमाणे पालट जाणवला. ते पहातांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील ‘दैवीशक्ती अधिक वाढली आहे’, असे मला जाणवले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
२ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांच्या छायाचित्रांकडे पाहून आत्मनिवेदन केल्यावर हलके वाटणे : आश्रमातील साधकांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्याचा लाभ होण्यासाठी काही अंक दिले होते. त्यांपैकी एक अंक मी माझ्याजवळ ठेवला आहे. त्यामध्ये परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांची छायाचित्रे आहेत. कधी कधी मला फार त्रास होत असेल; काळजी वाटत असेल, तर त्या वेळी मी नामजप करते आणि मधेमधे दैनिकातील छायाचित्रांना आत्मनिवेदन करून रडते अन् मन मोकळे करते. त्यांना आत्मनिवेदन केल्यामुळे मला हलके वाटतेे.
२ आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू हे तीन गुरु सर्वस्व आहेत’, असा मनाचा निश्चय होणे आणि त्यांना आत्मनिवेदन न केल्यास खेद वाटणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू हे तीनही गुरु माझ्यासाठी आधार बनले आहेत’, असे मला वाटतेे. त्यामुळे माझ्या मनाचा निश्चय झाला, ‘हे तीन गुरु हेच माझे सर्वस्व आहेत. त्यांच्याविना मला कुणीच नाही.’ मी त्यांच्याशी बोलले नाही, तर मला चुकल्या चुकल्या सारखे वाटतेे. मी प्रतिदिन या दैनिकातील तीनही गुरूंच्या छायाचित्रांभोवती उदबत्ती फिरवते. तेव्हा मी ‘ते तिघे प्रत्यक्ष माझ्या समोरच आहेत’, असा भाव ठेवून १० मिनिटे नामजप करत त्यांना ओवाळत असते. त्या वेळी मला देवासाठी ‘किती करू ? नि काय करू ?’, असे व्हायचे.
२ इ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांंच्या बोलण्यातून आणि हातातून शक्ती सभोवताली प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : १७.४.२०२२ या दिवशी आश्रमात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २३ वा वर्धापनदिन होता. त्या दिवशी सकाळपासून मला ‘आज काहीतरी चांगले होणार आहे’, असे वाटत होते. मी दुपारी ३.३० वाजता भोजनकक्षात चहा घेण्यास गेले. तेवढ्यात मी दुसर्या माळ्यावर उद़्वाहनाच्या (‘लिफ्ट’च्या) बाहेर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांना पाहिले. त्या सर्व साधकांना भेटत भोजनकक्षात येत होत्या. त्यांनी मला ‘प्रतीक्षा’ अशी हाक मारली आणि माझ्याजवळ आल्या. त्याच वेळी त्या जवळ उभे असणार्या साधकांशी बोलतही होत्या. तेव्हा मला ‘त्यांच्या बोलण्यातून आणि हातांतून आध्यात्मिक शक्ती प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवले. ‘त्यांच्यातील शक्ती सभोवताली प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले.
२ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या छायाचित्रातील पालट देवाने आधी सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून अनुभवण्यास देणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई माझ्या जवळ आल्या. त्यांच्या हाताचा स्पर्श होताच मला दैनिकातील त्यांच्या छायाचित्राचे स्मरण झाले. त्यांनी मला केलेला स्पर्श, त्यांच्या हातातील आध्यात्मिक शक्ती आणि दैनिकातील त्यांच्या छायाचित्रातील पालट, हे मला देवाने आधी सूक्ष्मातून आणि नंतर स्थुलातून अनुभवण्यास दिले. अशा साक्षात् श्री महालक्ष्मीदेवीविषयी मला कृतज्ञता वाटून भरून आले.
२ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची भेट झाल्याने सर्व साधक एका वेगळ्याच विश्वात गेल्याप्रमाणे जाणवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई भेटल्या त्या वेळी वातावरणात हलकेपणा आणि शीतलता जाणवत होती. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई सर्व साधकांना पुष्कळ दिवसांनी भेटल्या. कोरोना महामारीच्या काळात त्यांची भेट होऊ शकली नाही. याचा आनंद सर्वजण अनुभवत होते. श्रीसत्शक्ति बिंदाताई आल्यानंतर ‘त्यांनी आम्हाला एका वेगळ्याच विश्वात नेले’, असे मला जाणवले. हा वर्धापनदिन सोहळा आम्हा सर्वांसाठी विशेष होता.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.४.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक- संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |