१. ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप भ्रमणभाषवर लावल्यावर रात्री भुंकणार्या कुत्र्यांचा आवाज बंद होणे
‘रात्री १२ नंतर झोपण्यासाठी खोलीत गेल्यावर बर्याचदा खिडकीबाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याचा पुष्कळ आवाज येत असतो. त्या वेळी आम्ही ‘सनातन चैतन्यवाणी’ या ‘ॲप’मधील ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप चालू करतो. अनेकदा केवळ ‘ॲप’ चालू करून जप चालू होईपर्यंत अगदी एका मिनिटात कुत्र्यांचे भुंकणे थांबलेले असते, तर काही वेळा खिडकीजवळ असलेली कुत्री दूरवर जाऊन भुंकत असल्याचे लक्षात येते. हा अनुभव आम्हाला साधारण प्रतिदिनच येत आहे.’
– श्री. संदीप शिंदे आणि सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. तोंडाने (वैखरीतून) नामजप करण्यापेक्षा मनात (मध्यमा वाणीतून) नामजप करण्याचे महत्त्व लक्षात येणे
‘श्रीरामनवमीच्या रात्री असेच कुत्र्यांचे भुंकणे चालू झाल्यावर मी ‘ॲप’मधील जप न लावता स्वतःच वैखरीतून ‘श्री हनुमते नमः ।’ हा नामजप थोडा वेळ केला; पण काही लाभ झाला नाही. मग स्वाती (पत्नी) म्हणाली, ‘‘आता मनातल्या मनात नामजप करून पहा.’’ त्या वेळी मी मनातल्या मनात ‘श्री हनुमते नमः ।’ नामजप चालू केला. साधारण ८ – १० वेळा जप केल्यावर कुत्र्यांचे भुंकणे थांबले. यातून वैखरीतून नामजप करण्यापेक्षा मनातून, म्हणजेच मध्यमा वाणीतून नामजप करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा मनावर बिंबले.
– श्री. संदीप दत्तात्रेय शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२२)