सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
सौ. अर्चना घनवट

माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण ६.३ होते. (महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण सर्वसाधारण १२ एवढे असते.) मला हाडे दुखणे, श्वास घेता न येणे, धाप लागणे, २ जिने चढल्यावर पायांत गोळे येणे, पित्त होणे, चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी इत्यादी शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास होत होते. मला ६ मासांपासून असे त्रास होत होते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणार्‍या त्रासांविषयी लिहून पाठवल्यावर त्यांनी मला नामजपादी उपाय सांगितले. त्यानुसार नामजपादी उपाय केल्यावर २ मासांत माझ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढले आणि अन्य त्रास ७० टक्के इतक्या प्रमाणात उणावले.’

– सौ. अर्चना सुनील घनवट, पुणे

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक