जिल्हा बँक निवडणूक

सातारा, १० नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा जिल्हा बँकेसाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि सातारा तालुका विकास सेवा सोसायटीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे. १० नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहनिर्माण कोट्यातून अर्ज प्रविष्ट केला होता. त्यांच्या विरोधात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे समर्थक ज्ञानदेव पवार, दिलीपसिंह भोसले, उदयसिंह बरदाडे यांनी अर्ज प्रविष्ट केले होते. रामराजे यांच्या समर्थकांसह अन्य उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात विनय कडव आणि पांडुरंग देशमुख यांनी अर्ज प्रविष्ट केले होते. त्यांनीही अर्ज मागे घेतल्यामुळे आमदार भोसले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !