भाजपच्‍या उमेदवाराच्‍या बहिणीवर जीवघेणे आक्रमण !

त्‍या निवडणुकीचा प्रचार करून घरी परतत होत्‍या. आक्रमण करणारे लोक अंधारात पसार झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे.

लातूरचे उमेदवार अमित देशमुख यांच्‍या व्‍हिडिओतून काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड !

काँग्रेसचे महिलांविरोधी धोरण उघड होत असल्‍याचा आरोप वाघ यांनी केला आहे. अमित देशमुख यांनी भाजपच्‍या उमेदवार अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा ‘आर्ची’ (एका चित्रपटातील अभिनेत्रीचे टोपण नाव) असा उल्लेख केला आहे.

हिंदु असल्‍याची लाज वाटत असेल, तर शरद पवारांनी ते हिंदु नाहीत, असे सांगावे ! – किरीट सोमय्‍या

अन्‍य धर्मियांचे लांगूलचालन करणार्‍या राजकारण्‍यांना या निवडणुकीत त्‍यांची जागा दाखवून द्यायला हवी !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : बविआच्‍या कार्यकर्त्‍यांचा गैरसमज झाला !; मुंबईत ४१ लाख ९१ सहस्र रुपये जप्‍त !

विरारच्‍या विवांत हॉटेलमध्‍ये भाजपचे राष्‍ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे पैसे वाटत असल्‍याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी तरुणांना सट्टा आणि वाळूचोरीचा रोजगार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सुनील केदार इतकी वर्षे या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यांच्या कार्यकाळात सावनेर मतदारसंघाची काय अवस्था आहे, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, असेही फडणवीस म्हणाले.

नागपूर येथे प्रियांका गांधी यांच्या ‘रोड शो’त गोंधळ !

या वेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपच्या समर्थकांना मी शुभेच्छा देते; पण जिंकणार तर महाविकास आघाडीच आहे. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्याने तणाव वाढला.

निवडणूक आयोगाकडून भाजपला प्रचाराचे विज्ञापन असणारा व्हिडिओ हटवण्याचा आदेश

व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले झारखंड मुक्ती मोर्चाच्या समर्थकाच्या घरावर मुसलमान घुसखोरांनी बलपूर्वक केलेले अतिक्रमण !

सनातन हा भारताचा पाया असून सनातनवर प्रहार करणे, हे विनाशाला आमंत्रण आहे ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

‘बटे थे तब कटे थे, अब बटेंगे नहीं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

Manipur NPP Withdraws Support : मणीपूरमध्ये नॅशनल पीपल्स पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढला !

मणीपूर येथे नॅशनल पीपल्स पक्षाने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. गेल्या वर्षभरापासून राज्यात हिंसाचार चालू आहे. याचे कारण देत कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पक्षाने हा निर्णय घेतला. असे असले, तरी सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे तेे कोसळणार नाही.

Bangladeshi Infiltrators Protected In Jharkhand : झारखंडमध्ये ‘झारखंड मुक्ती मोर्चा’चे सरकार बांगलादेशींना मदरशांत आश्रय देत आहे ! – जगद् प्रसाद नड्डा, भाजप अध्यक्ष

केंद्र सरकारने देशातील सर्व मदरसे बंद करून त्यांतील मुलांना आता सामान्य शाळांमध्ये शिकवण्यास पाठवण्याचा कायदा करणे आवश्यक आहे !