मला उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच अटकेचा डाव रचला ! – भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांचा आरोप

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो, तर मला अटक झाली नसती. भाजपचे उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच माझ्या अटकेचा प्रकार घडला असल्याचा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

खटाव तालुक्यात (जिल्हा सातारा) वाळूची तस्करी केल्याप्रकरणी दोघे कह्यात

वाळूतस्करांना वेळीच आळा घातला असता, तर आज कोरोनासारख्या संकटकाळात अशा गुन्हेगारांनी डोके वर काढले नसते. आता कोरोना संकटाची स्थिती सांभाळून या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे !

नगर येथे विनापरवाना चालू असलेल्या ‘सॅनिटायझर’ कारखान्यावर पोलिसांची धाड

असे प्रकार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहेत. राज्यात असे अन्यत्र होत आहे का ? याची तात्काळ आणि कसून पडताळणी होऊन योग्य कारवाई अपेक्षित आहे !

कोरोनाबाधित मृतदेहांवरील कपडे चोरून त्यावर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणारी टोळी अटकेत !

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांकडून समाजाला साधनेचे धडे तर दूरचेच; पण साधे नैतिक मूल्यांचेही धडे न दिल्याचे फलित ! मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या  अशा विकृत मानसिकता असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधात अटक वॉरंट !

पडळ येथील साखर कारखान्यावर एका अधिकार्‍याला मारहाण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अटक वॉरंट काढले आहे

राज्यातील बंदीवानांनी कारागृह भरली असल्याने अत्यावश्यक असणार्‍यांनाच अटक करा ! – अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांचा आदेश

४६ कारागृहांची बंदीवान ठेवण्याची क्षमता २३ सहस्र २१७ असून सद्याच्या स्थितीमध्ये तेथे ३४ सहस्र ८९६ बंदीवान आहेत.

फलटण (जिल्हा सातारा) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अटकेत !

तिघे मिळून रुग्णांच्या नातेवाइकांना ३ सहस्र रुपयांचे इंजेक्शन ३५ सहस्र रुपयांना विकत होते.

पुणे येथे ठराविक रकमेपेक्षा अधिक रक्कम घेतांना महिलेशी अश्‍लील वर्तन करणार्‍या रुग्णवाहिका चालकाला अटक !

किशोर पाटील या रुग्णवाहिका चालकाने अवघ्या ९ कि.मी. अंतरासाठी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दराने म्हणजे १४ सहस्र रुपये घेतले

मुंबईत युरेनियम सापडल्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग !

अणुबॉम्ब किंवा अन्य स्फोटके सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार्‍या युरेनियमच्या स्फोटकांचा साठा सापडल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे.

नागपूर येथे फळ विक्रेत्याने बनावट आधुनिक वैद्य बनून कोविड रुग्णांवर केले उपचार !

पूर्वी फळे आणि आईस्क्रीम यांची विक्री करणारा चंदन चौधरी याने कोरोना संकटाच्या काळात स्वतःला आधुनिक वैद्य असल्याचे खोटे भासवून रुग्णालय चालू केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.