मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ लिहून धार्मिक तणाव निर्माण करणार्‍या दोघा धर्मांधांना अटक

  • हिंदूंना दंगलखोर ठरवण्याचे धर्मांधांचे षडयंत्रे जाणा !
  • अशा प्रकारे षडयंत्रे रचून धर्मांधांनी कितीतरी दंगली आतापर्यंत केल्या असतील, याची कल्पना करता येत नाही ! बांगलादेशात तर सामाजिक माध्यमांतून इस्लामचा अवमान करून हिंदूंवर आक्रमण करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. याविषयी भारतातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
पोलीस अधिकारी किरण खरे

भैसा (तेलंगाणा) – येथे काही दिवसांपूर्वी एका मशिदीच्या भिंतीवर ‘जय श्रीराम’ असे लिहिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणातून २ धर्मांध मुलांनीच ते लिहिल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना येथील सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती मिळाली.
भैंसा येथील पोलीस अधिकारी किरण खरे यांनी सांगितले की, मशिदीच्या भिंतीवर महंमद अब्दुल कैफ आणि एक अल्पवयीन मुलगा यांनी ‘जय श्रीराम’ लिहिले होते. या दोघांना अटक करण्यात आली आहे. महंमद कैफ हा २० वर्षांचा असून त्याचा दुसरा साथीदार हा १४ वर्षांचा आहे. दोघेही मशिदी जवळच रहातात.