प्रत्येक वर्षी दीड लाख भारतीय सोडतात नागरिकत्व !

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संसदेत दिलेल्या आकडेवारीनुसार प्रतिवर्षी सरासरी दीड लाख नागरिक भारताचे नागरिकत्व सोडत आहेत. त्यांची पहिली पसंती अमेरिकेला आहे.

डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य ८०.०५ रुपये !

अमेरिकेचे चलन ‘डॉलर’च्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झाले आहे. भारतीय रुपयाचे एका डॉलरला ८०.०५ रुपये इतके मूल्य झाले आहे.

गेल्या ६ मासांत ‘ॲमेझॉन’चे जंगल मुंबईच्या साडेसहा पट क्षेत्रफळाएवढे नष्ट !

जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !

अमेरिकेने निर्बंधांमध्ये सूट दिल्याने रशियाकडून ‘एस-४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा !

अमेरिकेने भारताला रशियाकडून ‘एस्-४००’ ही  क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी निर्बंधांमधून सूट दिली आहे.चीनच्या आक्रमतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे.

चीनमधून भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा पाश्‍चात्त्य आस्थापनांचा कल !

चीनमधून बाहेर पडलेल्या २३ टक्के युरोपीय गुंतवणूकदारांपैकी सर्वाधिक गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक केली आहे. याखेरीज इंडोनेशिया आणि व्हिएतनाम येथेही गुंतवणूक वाढत आहे.

जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येच्या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकार्‍याला २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.

शिकागो (अमेरिका) येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावरील गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

शिकागो येथे स्वातंत्र्यदिनाच्या संचलनावर करण्यात आलेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय रॉबर्ट क्रिमो याला अटक केली असून घटनास्थळावरून रायफल जप्त करण्यात आली आहे.

आयोगाची विधाने भारतीय राज्यघटना आणि लोकशाही यांच्याविषयीचे अज्ञान दर्शवतात ! – भारताने सुनावले

दुर्देवाने हा आयोग त्याच्या स्वतःच्या कार्यसूचीनुसार विधाने करतो आणि अहवालामध्ये साततत्याने चुकीची सूत्रे मांडतो, अशा शब्दांत भारताने या आयोगाला सुनावले.

न्यायपालिका केवळ राज्यघटनेला उत्तरदायी ! – सरन्यायाधीश

न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र असून ती केवळ राज्यघटनेला उत्तरदायी  आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले.

(म्हणे) भारतात अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका !

अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा