न्यायपालिका केवळ राज्यघटनेला उत्तरदायी ! – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

नवी देहली – न्यायपालिका पूर्णपणे स्वतंत्र असून ती केवळ राज्यघटनेला उत्तरदायी  आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे ‘असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स’ने २ जुलै या दिवशी आयोजित केलेल्या एका सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की,

१. सत्ताधारी पक्षाला असे वाटते की, प्रत्येक प्रकरणात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय द्यावा, तर विरोधी पक्षांना न्यायपालिकेकडून त्यांच्या धोरणांना पाठिंबा देण्याची अपेक्षा असते.

२. आपण या वर्षी स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करत आहोत आणि आपले प्रजासत्ताक ७२ वर्षांचे झाले आहे; मात्र खेदाची गोष्ट ही आहे की, राज्यघटनेने प्रत्येक संस्थेकडे सोपवलेली भूमिका आणि दायित्व  जनतेला अजूनही पूर्णपणे समजलेले नाही.

३. सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील लोक अधिक सक्रीय होत असून ते त्यांची कर्तव्ये चोखपणे बजावत आहेत.