जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येच्या प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकार्‍याला २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बडतर्फ पोलीस अधिकारी डेरेक चाउविन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉयड यांच्या हत्येच्या प्रकरणी येथील न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी डेरेक चाउविन याला २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. जॉर्ज फ्लॉयड यांनी एका आंदोलनात सहभाग घेतला होता. त्या वेळी चाउविन याने त्याला पकडले आणि साडेनऊ मिनिटे त्यांच्या मानेवर स्वतःचा गुडघा ठेवून ती दाबून ठेवली. यात फ्लॉयड यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे संपूर्ण अमेरिकेत संताप व्यक्त होत अनेक दिवस आंदोलने करण्यात आली होती. ‘कृष्णवर्णियांचे जीवनही महत्त्वाचे आहे’ या नावाने ही आंदोलने करण्यात आली होती. यानंतर चाउविन याला अटक करून या घटनेची चौकशी करण्यात आली होती.