अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्याविषयीच्या आयोगाची भारतविरोधी विधाने
नवी देहली – अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने भारताविषयी केलेली पक्षापाती आणि अयोग्य विधाने आम्ही वाचली. ही विधाने भारताची घटनात्मक चौकट आणि लोकशाही यांच्याविषयीचे अज्ञान दर्शवतात. दुर्देवाने हा आयोग त्याच्या स्वतःच्या कार्यसूचीनुसार विधाने करतो आणि अहवालामध्ये साततत्याने चुकीची सूत्रे मांडतो, अशा शब्दांत भारताने या आयोगाला सुनावले. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या आयोगाच्या विधानांना प्रत्युत्तर दिले. या आयोगाने ‘भारतातील अल्पसंख्यांकांच्या सामूहिक हत्या होऊ शकतात’, असे विधान केले होते.