(म्हणे) भारतात अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका !

अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांचा कथित दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांचे अधिकार संकटात आहेत. अल्पसंख्यांकांच्या सामूहिक नरसंहाराचा धोका आहे, असे विधान अमेरिकेचे धार्मिक स्वातंत्र्याविषयीचे राजदूत रशद हुसेन यांनी अमेरिकेच्या एका समितीसमोर बोलतांना केले. हुसेन हे मूळचे भारतीय वंशाचे आहेत.

हुसेन पुढे म्हणाले की, आम्ही भारतात चर्चवरील आक्रमणे, तसेच हिजाबवरील बंदी यांसारख्या घटना पाहिल्या आहेत. एका मंत्र्याने तर असे म्हटले की, भारतामध्ये मुसलमान, म्हणजे वाळवी आहे. मुसलमान, ख्रिस्ती, शीख, दलित, आदिवासी आदींच्या अधिकारांचे भारतात रक्षण झाले पाहिजे. भारत एक सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. तेथे अमेरिकेप्रमाणे समान भागीदारी निश्‍चित व्हावी, असे अमेरिकेला वाटते.

संपादकीय भूमिका

  • गेली ३ दशके काश्मीरमध्ये हिंदूंचा नरसंहार केला जात आहे, ते रशद हुसेन यांना दिसत नाही का ? कि ते जाणीपूर्वक गांधी यांच्या माकडांप्रमाणे आंधळे, बहिरे आणि मूके असल्याचे दाखवत आहेत ?
  • अमेरिकेत गेली अनेक शतके अश्‍वेतांचा वंशसंहार होत असतांना रशद हुसेन यांना तो दिसत नाही का ?