अमेरिकेने निर्बंधांमध्ये सूट दिल्याने रशियाकडून ‘एस-४००’ क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्याचा भारताचा मार्ग मोकळा !

‘एस्-४००’ क्षेपणास्त्र

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने भारताला रशियाकडून ‘एस्-४००’ ही  क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी निर्बंधांमधून सूट दिली आहे. अमेरिकेच्या संसदेमध्ये ‘सी.ए.ए.टी.एस्.ए.’ या कायद्यामध्ये पालट करण्यासाठीचे विधेयक आवाजी मताने संमत करण्यात आले. चीनच्या आक्रमतेला तोंड देण्यासाठी अमेरिका सरकारने हा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये भारताने रशियासमवेत ही प्रणाली खरेदी करण्याविषयी करार केला आहे; मात्र या करारानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हा करार करणे म्हणजे अमेरिकी निर्बंधांना सामोरे जाणे होय’, अशी चेतावणी दिली होती.