डॉलरच्या तुलनेत भारताच्या रुपयाचे मूल्य ८०.०५ रुपये !

नवी देहली – अमेरिकेचे चलन ‘डॉलर’च्या तुलनेत भारतीय चलन रुपयाचे पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमूल्यन झाले आहे. भारतीय रुपयाचे एका डॉलरला ८०.०५ रुपये इतके मूल्य झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण चालू आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपयाचे हे अवमूल्यन कच्च्या तेलााच्या किमतीतील वाढ आणि बाजारातून काढण्यात येणारी परदेशी गुंतवणूक, यांमुळे झाले आहे.