धूर्त तालिबान !

तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !

आतंकवाद्यांना शोधून ठार करा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा सैन्याला आदेश

काबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर २६ ऑगस्टला इस्लामिक स्टेटकडून करण्यात आलेल्या २ बॉम्बस्फोटांत १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध करण्यासाठी ओसामा बिन लादेन याचा वापर केला ! – तालिबान

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे केले, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यासह तालिबानही ज्या आतंकवादी कारवाया करत आहे, त्याचेही समर्थन करता येऊ शकत नाही.

तालिबान पाकिस्तान कह्यात घेऊन त्याची अण्वस्त्रे हातात घेईल ! – जो बायडेन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून पाकची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या कह्यात जाण्याची भीती आहे.

अमेरिकी गुप्तहेरांचा कोरोनाच्या उगमाच्या शोधाविषयीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर !

अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाने कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, याच्या केलेल्या पडताळणीचा अहवाल राष्ट्राध्यक्षांना सादर केला आहे. हा अहवाल पूर्ण नसून चीनच्या असहकार्यामुळे त्याचा उगम यात स्पष्ट करण्यात आलेला नाही.

काबुल विमानतळाच्या परिसरात इस्लामिक स्टेटकडून आक्रमणाची शक्यता

काबुल विमानतळावर अफगाणी लोकांची, तसेच परदेशी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीवर इस्लामिक स्टेटकडून आत्मघाती आक्रमण होण्याची शक्यता अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी व्यक्त केली आहे.

जगातील ६० देशांनी अफगाणिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य थांबवले !

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर अमेरिकेच्या बँकांमधील अफगाण सरकारची खाती सील करण्यात आली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानचे अब्जावधी रुपये परत घेण्यासही बंदी घातली आहे.

अफगाणिस्तानातून अमेरिकेत आणलेल्या अफगाणी नागरिकांमध्ये सहस्रो आतंकवादी ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

‘भारतातही असेच झाले नाही ना ?’ हे भारतीय सुरक्षायंत्रणांनी पडताळून पहाणे आवश्यक !

तालिबानला अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवण्यामागे पाकचा हात ! – अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे खासदार स्टीव शॅबॉट

जे जगजाहीर आहे, ते सांगण्यापेक्षा ‘अमेरिका पाकच्या विरोधात काय कृती करणार आहे ?’ हे तिने सांगणे अधिक आवश्यक आणि अपेक्षित आहे !

(म्हणे) ‘बलाढ्य अमेरिकेला सामान बांधून परत जावे लागले; भारतालाही अजूनही संधी आहे !’

अमेरिकेला जे जमले नाही, ते करून दाखवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे; मात्र भारतीय सैन्यावर विश्‍वास न ठेवणार्‍या मेहबूबा मुफ्ती अशा प्रकारची विधाने करणारच ! त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना नजरकैदेत नाही, तर कारागृहात टाकले पाहिजे !