(म्हणे) ‘बलाढ्य अमेरिकेला सामान बांधून परत जावे लागले; भारतालाही अजूनही संधी आहे !’

मेहबूबा मुफ्ती यांची अफगाणिस्तानमधील परिस्थितीवरून केंद्र सरकारला चेतावणी

अमेरिकेला जे जमले नाही, ते करून दाखवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे; मात्र भारतीय सैन्यावर विश्‍वास न ठेवणार्‍या मेहबूबा मुफ्ती अशा प्रकारची विधाने करणारच ! त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना नजरकैदेत नाही, तर कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक

माजी मुख्यमंत्री आणि ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – मी वारंवार सांगत आहे की, आमची परीक्षा घेऊ नका. सुधारा, सांभाळा ! शेजारी काय होत आहे, ते पहा. एवढी मोठी शक्ती असलेल्या अमेरिकेलाही अफगाणिस्तानमधून सामान बांधून परत जावे लागले. तुम्हाला अजूनही संधी आहे. ज्याप्रकारे वाजपेयी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये चर्चा चालू केली होती, त्याचप्रमाणे तुम्हीही चर्चा चालू करा. जम्मू-काश्मीरचे चित्र तुम्ही अवैधपणे बिघडवले; राज्याचे तुकडे तुकडे केले. ती चूक सुधारा अन्यथा फार उशीर होईल, अशी चेतावणी राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि ‘पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी’च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा हवाला देत केंद्र सरकारला दिली.

मुफ्ती म्हणाल्या की, त्यांना (केंद्र सरकारला) असे वाटत असेल की, ‘आम्ही फार छोटे आहोत, ही काय बडबडते आहे ? ही काय करू शकणार ?’ मात्र कधी कधी एखादी मुंगी जेव्हा हत्तीच्या सोंडेत शिरते, तेव्ही ती त्याचे जगणे कठीण करते, अशी धमकीही त्यांनी दिली. (अशी धमकी देणार्‍यांवर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे ! – संपादक)