तालिबान पाकिस्तान कह्यात घेऊन त्याची अण्वस्त्रे हातात घेईल ! – जो बायडेन

नवी देहली –  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले की, अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलेल्या तालिबानकडून पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात आणि यातून पाकची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या कह्यात जाण्याची भीती आहे. याविषयी पाकिस्तानने योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.