कोरोनाचे संकट असूनही इस्टरसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी
पणजी – सामाजिक कार्यकर्ते तथा अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्स यांनी इस्टरसाठी ११ एप्रिल या दिवशी लोकांना त्यांच्या आवडीचे मद्य विकत घेता यावे, यासाठी काही कालावधीसाठी मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. ‘इस्टरच्या दिवशी कुटुंब एकत्र येऊन जेवण घेत असतात आणि हे जेवण मद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही’, असे अधिवक्ता रॉड्रिग्स यांनी या मागणी पत्रात म्हटले आहे. (‘गुढीपाडव्याला मिठाईची दुकाने उघडी ठेवा’, अशी मागणी न करता हिंदूंनी शासनाच्या उपाययोजनांना साहाय्य केले; पण अन्य धर्मीय एक तर मशिदीत प्रार्थनेसाठी जमावाने येतात किंवा मद्याची दुकाने उघडी ठेवण्याची मागणी करतात. – संपादक)