जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १ सहस्र ९० उमेदवार रिंगणात : ४ ग्रामपंचायती बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही दंगल नियंत्रण पथक तैनात करणे आणि पोलिसांनी संचलन करणे, या गोष्टी कराव्या लागणारी निरर्थक लोकशाही !

कोरोनावरील लस २०० रुपयांमध्ये शासनाला उपलब्ध करून देणार ! – आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

‘कोरोनाशिल्ड’ ही लस खासगी रुग्णालयांसाठी १ सहस्र रुपये, तर शासनासाठी २०० रुपयांना उपलब्ध करून देणार आहोत – सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाचे पोलीस संरक्षणात सर्वेक्षण

शासनाने प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम छुप्या पद्धतीने पूर्ण केले. ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला मान्यता देणार नसल्याचा दावा करून आंदोलन तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे.

गोव्यात अल्प कालावधीत सर्वांनाच लस देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यात अल्प कालावधीत १०० टक्के लोकांना लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. राज्याचे क्षेत्रफळ लहान असल्याने, याचा लाभ लसीकरणाच्या वेळी होणार आहे.

स्वागतार्ह निर्णय !

या निर्णयामुळे इस्लामी ग्राहकांपुढे हिंदू ग्राहकांना टिकवायचे कि नाही, हाही विचार आता कालांतराने हलाल प्रमाणपत्र घेणार्‍या आस्थापनांना करावा लागेल, हे निश्‍चित ! या निर्णयाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध करण्यासाठी देण्यात येणार्‍या पुढील लढ्यासाठी निश्‍चितच बळ मिळेल, यात शंका नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे.

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

नागपूर येथे विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष कार्यरत

नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्‍या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.