स्वागतार्ह निर्णय !

या निर्णयामुळे इस्लामी ग्राहकांपुढे हिंदू ग्राहकांना टिकवायचे कि नाही, हाही विचार आता कालांतराने हलाल प्रमाणपत्र घेणार्‍या आस्थापनांना करावा लागेल, हे निश्‍चित ! या निर्णयाने हिंदुत्वनिष्ठ संघटनांना ‘हलाल’ प्रमाणपत्राला विरोध करण्यासाठी देण्यात येणार्‍या पुढील लढ्यासाठी निश्‍चितच बळ मिळेल, यात शंका नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे.

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.

नागपूर येथे विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष कार्यरत

नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्‍या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक

सोलापूर येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत.

पुण्यातील सर्व महाविद्यालये ११ जानेवारीपासून चालू करण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा निर्णय

‘प्रॅक्टिकल करण्यात अडचणी असल्याने आता ११ जानेवारीपासून सर्व अभ्यासक्रमांचे वर्ग प्रॅक्टिकलसह चालू होतील’

माजी महसूल मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अपहरण आणि खंडणी उकळल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा नोंद

अपहरण करून मारहाण करत ५ लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायती बिनविरोध !

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी या दिवशी सुटी घोषित करण्यात आली आहे.